
राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
दिल्लीत शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये सरकारकडून कायदे दीड ते दोन वर्षे निलंबित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. समितीशी चर्चा करून जो अहवाल सादर करण्यात येईल तो लागू केला जाईल असं आश्वासन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलं आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात विधान परिषदेच्या सभागृहात वीर सावरकरांचा फोटो लावल्यानं वाद निर्माण झाला आहे. तर 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात 2 मिनिटं मौन बाळगण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. अमेरिकेत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउस सोडलं आहे. शेवटच्या काही तासात अनेक निर्णय घेऊन त्यांनी धक्काही दिला आहे.
ट्रम्प यांनी जाता जाता दिले धक्के; गडबडीत उरकली कामे
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सूत्रे सोडता सोडता काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. शेवटच्या काही तासांमध्ये त्यांनी गडबडीत कामं उरकली. - सविस्तर वाचा
डोनाल्ड ट्र्म्प यांचा व्हाइट हाऊसला रामराम; पाहा व्हिडिओ
ज्यो बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाऊस सोडलं आहे. - सविस्तर वाचा
देशात 30 जानेवारीला 2 मिनिटं मौन; केंद्र सरकारचा आदेश
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच 30 जानेवारीबाबत केंद्र सरकारने आदेश जारी केला आहे. हा दिवस दरवेळीप्रमाणे हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. - सविस्तर वाचा
सावरकरांच्या फोटोवरून वाद; विधान परिषदेच्या अध्यक्षांना काँग्रेसचं पत्र
उत्तर प्रदेशात लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी सभागृहाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. यावेळी विधान परिषदेत स्वातंत्र्य सैनिकांचे फोटोंमध्ये वीर सावरकरांच्या फोटोचाही समावेश करण्यात आला. - सविस्तर वाचा
टीम इंडियाच्या कसोटी विजयानंतर मोदींचा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना रिप्लाय
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील क्रिकेट मॅच नेहमीच पाहण्यासारखी होते. कमालीची उत्सुकता ताणून धरलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटची मॅच शेवटच्या दिवशी ३ विकेट शिल्लक राखत भारताने जिंकली आणि ऐतिहासिक विजय साजरा केला. - सविस्तर वाचा
'चारचौघात सांगता येणार नाही असं साजिद माझ्याशी वागला'
दिवंगत अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येवर बीबीसीनं जो माहितीपट तयार केला आहे त्यात जियाच्या बहिणीनं दिग्दर्शक साजिद खानवर मी टू चे आरोप केले आहेत. - सविस्तर वाचा
ब्रिस्बेनचं नाव पंत नगर करा; योगींचा फोटो शेअर करत सेहवागची नामांतरावर बॅटिंग
"पंतच्या खेळीनं सर्वांनाच प्रभावित केले आहे. मालिका विजयानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. - सविस्तर वाचा
IPL 2020 Auction 2021: धोनी-रैनाची दोस्ती तुटायची नाय! केदार, चावला आणि मुरलीची पडणार विकेट
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्ज सुरेश रैनाला रिटेन करणार असून संघातील समतोल राखण्यासाठी केदार जाधव, पियुष चावला आणि मुरली विजय यांना रिलीज करण्यात येणार आहे. - सविस्तर वाचा
Gold Price - सोन्यासह चांदीचे दरही वाढले; जाणून घ्या आजचे भाव
भारतीय बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. दिल्लीतील सराफ बाजारात बुधवारी म्हणजेच 20 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर 347 रुपये प्रति 10 ग्रॅमला वाढले. तर चांदीच्या दरातही वाढ बघायला मिळाली. - सविस्तर वाचा
Union Budget 2021: कोरोनानंतर बजेटमध्ये आरोग्यासाठी काय?
कोरोनाच्या संकटानंतर ओढावलेल्या आर्थिक घसरणीनंतर सरकारच्या आगामी अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळणार? कोणत्या क्षेत्राचा प्राधान्याने विचार करण्यात येणार? यासारख्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. - सविस्तर वाचा
Edited By - Prashant Patil