नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ते राज्यसभेत कृषी कायद्यावरून काँग्रेसची सरकारवर टीका; वाचा एका क्लिकवर

top news
top news

महाराष्ट्र काँग्रेसने आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये विधानसभेचा राजीनामा दिलेल्या नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. बीडमध्ये कट्टर विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. देशात कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु असून शनिवारी होणारे चक्का जाम हे आपआपल्या गावी आणि भागात करावं असं आवाहन राकेश टिकैत यांनी केलं आहे. दरम्यान, कृषी कायद्यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : विधानसभा अध्यक्ष असलेले नाना पटोले यांनी काल आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा अधिकृत राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती. वाचा सविस्तर

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ शुक्रवारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विरोधासाठी विरोध न करता सामाजिक निर्णय, कार्यक्रमात ही भावंड एकत्र दिसत आले आहेत. वाचा सविस्तर

नवी दिल्ली :  कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात संघटनांनी चक्का जामची घोषणा केली होती. मात्र हे चक्का जाम आपआपल्या गावी, भागात करावं असं आवाहन नेते राकेश टिकैत यांनी केलं आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तोमर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, नरेंद्रसिंह तोमर हे चांगले व्यक्ती आहेत, पण त्यांना शेतीबद्दल काहीच माहिती नाही, मला वाटतं कृषी कायदे दिल्लीत नव्हे, मुंबईत तयार झाले. वाचा सविस्तर

'India Against Propaganda' या विधानात चुकीचं काय आहे? काहीच तर नाही. कुणी #IndiaTogether असं म्हणत असेल तर कुणाच्याही पोटात दुखण्याचं तसं काहीच कारण नाही. मात्र, India Against Propaganda ही घोषणा फारच मोघम आहे. वाचा सविस्तर

अहमदाबाद : गुजरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या मुलीला नगर पालिकेच्या निवडणुकीचं तिकीट देण्यास नकार दिला आहे. सोनल मोदी यांनी अहमदाबाद नगर पालिकेसाठी तिकिटाची मागणी केली होती. वाचा सविस्तर

मुंबई : रेल्वेनं एकूण 2532 पदांसाठी जाहीरात काढली असून यामध्ये वेगवेगळ्या विभागात भरती केली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूरसह इतर ठिकाणी भरती होईल.  वाचा सविस्तर

लंडन : आयुष्य 11 महिने 'लॉकडाऊन' झालं; भाऊला कोरोनाची लाट आल्याचं माहितीच नाही, जगात कोरोनाने किती थैमान घातलं हे तरुणाला माहितीच नाही; कुटुंबाला प्रश्न पडलाय सांगायचं कसं? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : सुझुकीने Suzuki Hayabusa 2021 चे थर्ड जनरेशनचं मॉडेल अधिकृतपणे लाँच केलं. नव्या 2021 हायाबुसामध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळाले आहेत. वाचा सविस्तर

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी लग्नानंतर एकमेकांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी महाराष्ट्रीत एक सुंदर ठिकाण निवडलं आहे. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com