परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीला SC चा नकार ते महाराष्ट्र एटीएसला झटका; वाचा एका क्लिकवर

duparchya batmya
duparchya batmya

राज्यात मनसुख हिरेन प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून सचिन वाझेंच्या अटकेनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. बदलीमुळे नाराज झालेल्या मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयात का गेला नाहीत असा प्रश्न परमबीर सिंग यांना विचारला. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मुंबईत अंधेरी पश्चिममध्ये दररोज 200 ते 300 रुग्ण आढळत आहेत. देशाचे सध्याचे सरन्यायाधीश बोबडे 23 एप्रिलरोजी निवृत्त होत असून त्यांनी उत्तराधिकारी म्हणून एनव्ही रामण्णा यांच्या नावाची शिफारस केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे सर्जन जनरल म्हणून भारतीय अमेरिकन डॉक्टर विवेक मुर्ती यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. वाचा सविस्तर

केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी लस कधी आणि कशी मिळणार? जाणून घ्या सर्व काही वाचा सविस्तर

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवा, असे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत. वाचा सविस्तर

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एनआयएच्या हस्तक्षेपानंतरही एटीएसनं आपला तपास चालूच ठेवला. त्यामुळे एटीएस विरुद्ध एनआयए असा माहौल तयार झाल्याचं चित्र आहे. एटीएस विरुद्ध एनआयए? कोणाची ताकद जास्त वाचा सविस्तर

वाटा आणि घाटा फडणवीस सरकार मध्ये होत होते. आरएसएसला हे लोक किती वाटा देत होते, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. वाचा सविस्तर

मुंबईतील २४ वॉर्डपैकी अंधेरी पश्चिमेच्या वॉर्डमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. अंधेरी पश्चिमेला दररोज २०० ते ३०० दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळतायत. वाचा सविस्तर

सरन्यायाधीश बोबडे यांनी बुधवारी त्यांचा उत्तराधिकारी कोण असावा याबाबत शिफारस केली आहे. न्यायाधीश एन व्ही रामण्णा यांचे नाव त्यांनी सुचवले आहे. याबाबतचे पत्र केंद्र सरकारकडे पाठवले आहे. वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशातील डासना देवी मंदिराच्या पुजाऱ्याने धक्कादायक वक्तव्य केलंय. नरसिंहानंद सरस्वती यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. वाचा सविस्तर

भारतीय अमेरिकन डॉक्टर विवेक मूर्ती यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे सर्जन जनरल नियुक्ती झाली. अमेरिकेच्या संसदेनं मंगळवारी यावर मतदान घेऊन शिक्कामोर्तब केलं. वाचा सविस्तर

नेतान्याहू यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. दोन वर्षात चौथ्यांदा ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. नेतान्याहू यांनी विजयाचा दावा केला असला तरी त्यांना बहुमत मिळेल का? वाचा सविस्तर

"तू सतत लोकांशी पंगा का घेतेस", असा प्रश्न एकाने तिला विचारला असता कंगनाने त्यावर मोकळेपणाने उत्तर दिलं. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com