लेटरबॉम्बने महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता ते कोरोनाचं वर्तन बदललंय; वाचा एका क्लिकवर

latest news parambeer singh letter anil deshmukh devendra fadanvis ind vs eng corona virus india
latest news parambeer singh letter anil deshmukh devendra fadanvis ind vs eng corona virus india

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून हटवल्यानतंर परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. या पत्रामुळे राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात काही चॅटचा संदर्भ दिला असून यातून अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने होत असून कोरोना विषाणूचं वर्तन बदललं असल्याचं म्हटलं जात आहे. एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुली करायचे टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला आहे. वाचा सविस्तर

परमबीर सिंग यांनी पत्रातून केलेले आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत. परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खोटे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय. वाचा सविस्तर

महाराष्ट्राच्या कोणत्याच अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांबाबत असं पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे. या परिस्थितीत गृहमंत्री त्यांच्या पदावर राहू शकत नाहीत. आता त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाचा सविस्तर

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील गौप्यस्फोट करणारे चॅट; काय संभाषण झाले वाचा सविस्तर

कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय? महाराष्ट्रात सध्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती आहे. कारण पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाचा सविस्तर

कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे अनेक शहरांतील आणि राज्यातील शाळा-कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्याशिवाय काही राज्यातील बोर्ड परिक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर

एका जखमी पोलीस अधिकाऱ्याला (Police Constable) मदत करतानाचा भाजप (BJP) खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर

जपानमध्ये शनिवारी 7.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; यावेळचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाचा सविस्तर

साराने नुकतेच रॉयल लूकमधील फोटोशूटचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यातला तिचा लूक जबरदस्त तर आहेच पण त्याशिवाय तिने दिलेल्या कॅप्शनची चर्चा सर्वाधिक होत आहे. वाचा सविस्तर

IND vs ENG 5th T20 Live Updates - इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 224 धावा केल्या आहेत. वाचा सविस्तर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com