सीरम इन्स्टिट्यूटला आग ते दिल्लीत शेतकरी-पोलिसांमध्ये चर्चा; वाचा एका क्लिकवर

टीम ईसकाळ
Thursday, 21 January 2021

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. बीसीजी लस असलेल्या प्लांटमध्ये ही आग लागली असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. बीसीजी लस असलेल्या प्लांटमध्ये ही आग लागली असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे देशात शेतकरी आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यावर आंदोलक ठाम आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली नसून पर्यायी मार्ग सुचवला आहे. गुरुवारी सेन्सेक्सने उसळी घेतली.  

पुणे ः कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सविस्तर वाचा

पुणे - कोरोनाची लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. सविस्तर वाचा

नवी दिल्ली - देशात कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. शेतकरी काहीही झालं तरी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणारच या हट्टाला पेटले आहेत.  सविस्तर वाचा

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द होणा-या वेबसीरिजचे काही खरे नाही असे सध्या दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून तांडव मालिकेवरुन सुरु झालेला वाद शमलेला नाही. सविस्तर वाचा

सोलापूर : वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव आलेले वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बिल द्यावे, यासाठी सरसकट धोरण ठरवता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा असे मला वाटते.  सविस्तर वाचा

मुंबई : कोरोनानंतर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आलं. भारतात लॉकडाऊन लागल्यानंतर मुंबई शेअर बाजारात कमालीची घसरण झाली. सविस्तर वाचा

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  एका  चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली.  सविस्तर वाचा

वॉशिंग्टन : जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. परंतु, त्यांनी शपथ घेण्यापूर्वी व्हाइट हाऊसमध्ये एका विषयाची मोठी चर्चा सुरु झाली आहे. आपला कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर व्हाइट हाऊसचा निरोप देत डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह फ्लोरिडाला गेले. सविस्तर वाचा

नवी दिल्ली-  सराफ बाजारात आज  (दि.21) चांदीची चमक वाढली आहे. देशभरात सराफ बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव बुधवारच्या तुलनेत 452 रुपये प्रती 10 ग्रॅम महाग होऊन तो 49714 वर उघडला. सविस्तर वाचा

मुंबईत परतलेल्या खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमातून वगळण्यात आलं आहे. क्रिकेटर्संना  विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करुन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news serum institute delhi police farmers tractor rally ajinkya rahane team india