esakal | खासदाराचा संशयास्पद मृत्यू ते आसाममध्ये मोदींचा काँग्रेसवर निशाणा; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Aaj Divasbharat

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर हे मुंबईत मृतावस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याबाबत राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला होता. यानंतर निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

खासदाराचा संशयास्पद मृत्यू ते आसाममध्ये मोदींचा काँग्रेसवर निशाणा; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर हे मुंबईत मृतावस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याबाबत राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला होता. यानंतर निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत असून आकडेवारी धोक्याचा इशारा देत आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यातील परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. गुजरात राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये दोन्ही जागा भाजपने राखल्या आहेत. आसाम दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच्या सरकारने राज्याला सापत्न वागणूक दिल्याचं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

मुंबई - केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हेवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं जातं आहे. - वाचा सविस्तर

मुंबई - अखेर टॅक्सी, रिक्षाला पहिल्या टप्यात प्रत्येकी 3 रुपये आणि प्रति किलोमीटर 2 रुपये भाडे वाढीची मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने राज्य सरकारकडे शिफारस केली. - वाचा सविस्तर

सिंधुदुर्ग - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध घातले आहेत. - वाचा सविस्तर

नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जवळपास 4 हजार 421 नवे रुग्ण आढळले आहेत. ही वाढ जवळपास तीन टक्के इतकी आहे. - वाचा सविस्तर

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत गुजरातमधील दोन्ही जागा भाजपने जिंकल्याने आहेत त्यामुळे वरिष्ठ सभागृहात भाजपचे बळ ९४ पर्यंत वाढले आहे. - वाचा सविस्तर

या आधीच्या सरकारने आसामच्या उत्तरेकडील प्रदेशाला सावत्रपणाची वागणूक दिली त्यामुळे हा भाग अनेक सोयी-सुविधांपासून वंचित राहिला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. - वाचा सविस्तर 

काही सेलिब्रेटींनी सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीविषयी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. रंग दे बसंतीमधील प्रसिध्द कलाकार सिध्दार्थची प्रतिक्रिया व्हायरल झाली - वाचा सविस्तर 

पुणे - सह्याद्रीच्या द-याखो-यातील सर्वात दुर्गम अशी ओळख असलेल्या लिंगाण्यावर पाऊल ठेवायला सिंहाचं काळीज लागतं. असं म्हणतात. तो अजस्त्र सुळका पाहून भल्या भल्यांची तंतरते. - वाचा सविस्तर

Vijay Hazare Trophy 2021 : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत 18 संघानी 9 सामने खेळले आहेत. स्फॉट फिक्सिंग प्रकरणामुळं तब्बल 7 वर्षांपासून मैदानाबाहेर असलेल्या श्रीसंतने केरळच्या संघाकडून धारदार गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. - वाचा सविस्तर

पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या सहाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर लाहोर क्लंदर्स संघाकडून मैदानात उतरलाय. राशीदच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने पेशावर जाल्मी संघाला पराभूत केले. - वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil