esakal | CNG, PNG चा भडका ते फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांना भ्रष्टाचार प्रकरणी कैद; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

latest news 2 march maharashtra india world

राज्यासह देश विदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर 

CNG, PNG चा भडका ते फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांना भ्रष्टाचार प्रकरणी कैद; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इंधनाचे दर वाढत असताना सोमवारी एलपीजीही महाग झाले. त्यानंतर आता मंगळवारी सीएनजी, पीएनजीच्या दरातही वाढ झाली. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यानच दुधाचे दर लिटरला शंभर रुपये करण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र असे काही होणार नसल्याचं किसान मोर्चाने स्पष्ट केले. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी यांना भ्रष्टाचार प्रकरणी एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून सुरू असलेली ‘मर्चंडाइस एक्स्पोर्टस फ्रॉम इंडिया स्कीम’ (एमईआयएस) ही निर्यात प्रोत्साहन योजना ३१ डिसेंबरपासून बंद झाल्यानं शेतकरी कोंडीत. वाचा सविस्तर

उजनीतून 2 एप्रिलला पाणी सोडण्याचे नियोजन; धरणात 69 टक्‍के पाणीसाठा; पावसाचा अंदाज पाहून उन्हाळ्यात यंदा एक रोटेशन सोडण्याचे नियोजन सुरु असून 2 एप्रिल ते मेअखेर असे पाणी सोडले जाईल. वाचा सविस्तर

दिल्ली-एनसीआरमध्ये CNG आणि PNG च्या दरांमध्ये वाढ झाली आहे. सीएनजी गॅसच्या दरांमध्ये 70 पैसे प्रति किलोग्रॅम तर पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) मध्ये 91 पैशांची वाढ केली गेली आहे. वाचा सविस्तर

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी यांना एका स्थानिक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी ठरवून एक वर्षांची कैद आणि दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. तेव्हा जनावरांसाठीची सुई तर वापरणार नाही ना? असा प्रश्न मोदींनी लस टोचून घेताना विचारला. वाचा सविस्तर

पश्‍चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या दरम्यान आठ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून राज्यातील निवडणुकीच्या इतिहासातील ही सर्वांत दीर्घकालीन निवडणूक ठरणार आहे. वाचा सविस्तर

UPSC Success story: पहिलं MBBS केलं, नंतर IPS झाला आणि शेवटी IAS; वाचा सविस्तर 

विनामास्क फिरणाऱ्यांना 500 ते 2 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. पुणे पोलिस म्हणतात,'तुम्ही रोनाल्डो असलात तरी मास्क बंधनकारकच' वाचा सविस्तर

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच काही शेतकरी नेत्यांनी दुधाचे दर हे लिटरला शंभर रुपये एवढे करण्याची घोषणा केली होती. किसान मोर्चाने दिलं स्पष्टीकरण. वाचा सविस्तर

यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असणार असून, मार्च अखेरपासूनच अंगाची लाहीलाही होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर

loading image