esakal | दुपारच्या बातम्या: शेतकऱ्यांना 'सर्वोच्च' दिलासा ते लष्कर प्रमुखांचा सज्जड दम; ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Duparachta Batamya

शेतकरी आंदोलनाशी निगडीत सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज  सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणली आहे. केंद्र सरकारला हा मोठा दणका मानला जात आहे.

दुपारच्या बातम्या: शेतकऱ्यांना 'सर्वोच्च' दिलासा ते लष्कर प्रमुखांचा सज्जड दम; ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केंद्र सरकारला दणका; कृषी कायद्यांवर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, समितीची नेमणूक
शेतकरी आंदोलनाशी निगडीत सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज  सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणली आहे. केंद्र सरकारला हा मोठा दणका मानला जात आहे. - सविस्तर वाचा

'गांधींमुळे देशाची फाळणी तर दिग्विजय सिंह जिन्नाहून खतरनाक; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान
महात्मा गांधी यांची जयंती अथवा पुण्यदिन जवळ आला की काही वादग्रस्त वक्तव्यांची मालिका हमखास सुरु होते. कालच ग्वालियरच्या दौलतगंज येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात गोडसे कार्यशाळा (Godse Study Center ) सुरु करण्यात आली आहे. - सविस्तर वाचा

लडाखमधील थंडीने चिनी सैनिकांना शिकवला धडा; 10 हजार सैनिकांना घेतलं मागे
लडाखमध्ये भारतासोबत संघर्ष करणे चीनला महागात पडताना दिसत आहे. लडाखमधील कठोर हवामान सैनिकांना सहन होत नसल्याचं दिसतंय. - सविस्तर वाचा

'कप साँग गर्ल' मिथिलाचं बर्थ डे सेलिब्रेशन पाहिलयं ?
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिध्द चेहरा म्हणजे मिथिला पालकर. आज तिचा २८ वा वाढदिवस असून फॅन्सने व सेलिब्रिटींने तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. - सविस्तर वाचा

सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह, बँकॉकच्या हॉस्पिटलमध्ये 10 दिवसांसाठी क्वारंटाइन
भारताची स्टार शटलर सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांना बँकॉकच्या हॉस्पिटलमध्ये 10 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागेल. - सविस्तर वाचा

13 शहरांमध्ये झाली लशीची डिलिव्हरी; कोणत्या राज्याला किती डोस मिळाले?
देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 1.1 कोटी डोस विकत घेतले आहेत. - सविस्तर वाचा

मोठी बातमी : मंत्रालयात पुन्हा शॉर्टसर्किट, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घटना
मंत्रालयात पुन्हा शॉर्टसर्किट. मंत्रालयाच्या जुन्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटची घटना. वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा धोका अनर्थ टळला. मंत्रालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सकाळपासून वीज नाही. लाईट नसल्याने अनेक विभागाच काम देखील बंद आहे. - सविस्तर वाचा

पुणेकरांनो, या 16 केंद्रांवर मिळणार कोरोनावरील लस
भारतात येत्या 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून पुणे महापालिका प्रशासनाने पुण्यात 16 लसीकरण केंद्रे उभारली आहेत. - सविस्तर वाचा

Aus vs Ind: टीम इंडियाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. टीममधील याआधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त असताना त्यात आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची भर पडली आहे. - सविस्तर वाचा

पुण्यात खासगी क्‍लास होणार सुरु; पुणे महापालिकेने दिली परवानगी
पुणे शहरातील खासगी शिकवणी (क्‍लासेस) सुरू करण्यास महापालिकेने सोमवारी परवानगी दिली असून, हे वर्ग भरविताना सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य देण्याबाबत शिकवणी व्यवस्थापनाला बजावले आहे. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil

loading image