#JNU : विद्यार्थी पोलिसांना भिडले; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज!

वृत्तसंस्था
सोमवार, 9 डिसेंबर 2019

गत एका महिन्यापासून जेएनयूचे विद्यार्थी फी वाढीच्या विरोधात आंदोलन करणार असून येत्या 12 डिसेंबर पासून विद्यार्थ्यांची सत्र परिक्षा होणार आहे. मात्र, फी वाढीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांनी या परिक्षेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) वसतिगृह शुल्कवाढीच्या मुद्द्यावरून जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.9) राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा भिकाजी कामा प्लेस मेट्रो स्टेशन येथे पोलिसांनी रोखल्यानंतर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

फी वाढीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींना भेटायचे होते. या भेटीत त्यांची वाढीव फी मागे घ्यावी, असे आवाहन त्यांना राष्ट्रपतींकडे करायचे होते. यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनात जाऊन रामनाथ कोविंद यांना भेटायचे होते.

जेएनयूमधून निघालेल्या मोर्चाच्या अगोदरच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी कॅम्पसकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता आणि विद्यार्थ्यांनी शांततेत निषेध नोंदवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. 

- ओवेसींच्या या तीन प्रश्नांची उत्तरे अमित शहा देणार?

त्यातच मोर्चा सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी विद्यापीठाचे सर्व गेट बंद केले आहेत असा दावा करत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून फोटो पाठवायला सुरूवात केली. यानंतर मोर्चा सुरू होताच त्यांनी 'दिल्ली पोलिस परत जा' आणि 'शिक्षण सर्वांसाठी विनामूल्य असले पाहिजे' अशा घोषणा दिल्या.

हा मोर्चा भिकाजी कामा प्लेस मेट्रो स्टेशन येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गा ऐवजी दुसऱ्या मार्गाचा वापर करायचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेट्‌सचा अडथळा निर्माण केला. यावर विद्यार्थ्यांनी ही बॅरिकेट्‌स ओलांडण्याचा प्रयत्न करत पोलिसांसोबत वाद घालायला सुरूवात केल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

- पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनिअरची आत्महत्या

दरम्यान, गत एका महिन्यापासून जेएनयूचे विद्यार्थी फी वाढीच्या विरोधात आंदोलन करणार असून येत्या 12 डिसेंबर पासून विद्यार्थ्यांची सत्र परिक्षा होणार आहे. मात्र, फी वाढीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांनी या परिक्षेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.

- यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम..

दरम्यान जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी भिकाजी कामा प्लेस जवळील रिंग रोडवर ठिय्या आंदोलन केल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या वेळी रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lathicharged by Delhi Police on JNU Students during protest in Delhi over fee hike