झोजिला बोगद्याच्या कामाला शुभारंभ 

पीटीआय
रविवार, 20 मे 2018

आशियातील सर्वांत लांब बोगदा असणाऱ्या "झोजिला टनल'च्या उभारणीच्या कामास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पाचाच हा टनल एक भाग आहे. केंद्र सरकार राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असून हा प्रकल्प त्याचेच निदर्शक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. बौद्ध गुरू कुशोक बाकुला रिमपोछे यांच्या जन्मशताब्दीची सांगताही आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाली. 

लेह - आशियातील सर्वांत लांब बोगदा असणाऱ्या "झोजिला टनल'च्या उभारणीच्या कामास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पाचाच हा टनल एक भाग आहे. केंद्र सरकार राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असून हा प्रकल्प त्याचेच निदर्शक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. बौद्ध गुरू कुशोक बाकुला रिमपोछे यांच्या जन्मशताब्दीची सांगताही आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाली. 

लेह येथील मैदानावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, ""या बोगद्यामुळे जम्मू-काश्‍मीर राज्य हे देशाशी जोडले जाईल. हेच बौद्धगुरू रिमपोछे यांचे स्वप्न होते. लेह आणि लडाखमधील प्राचीन परंपरेचे जगाला दर्शन व्हावे म्हणून आभासी संग्राहलयदेखील उभारले जाईल.'' झोजिला खिंड ही श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर समुद्रसपाटीपासून 11 हजार 578 फूट उंचीवर आहे. हिवाळ्यात हिमवृष्टी झाल्यानंतर हा महामार्ग बंद होतो. यानंतर लडाखचा काश्‍मीरशी असणारा संबंधही तुटतो.  

स्थानिक भाषेतून भाषण 
पंतप्रधान मोदी यांचे आज सकाळीच जम्मू-काश्‍मीरमध्ये आगमन झाले, त्यांच्यासोबत रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती याही होत्या. रिमपोछे यांना आदरांजली वाहिल्यानंतर मोदींनी विविध विकासकामांचे उद्‌घाटन केले. विशेष म्हणजे मोदींनी आपल्या भाषणाला स्थानिक भाषेतून सुरवात केली. 

हा बोगदा चमत्कार 
रिमपोछे यांना आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, "" रिमपोछे यांचे योगदान आम्हाला माहिती आहे, लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. झोजिला हा केवळ बोगदा नसून आधुनिक काळातील चमत्कार आहे. या बोगद्यातील कार्बनडाय ऑक्‍साईड बाहेर काढण्यासाठी कुतुबमिनारपेक्षाही सात पटीने उंच असणारे टॉवर उभारले जाणार आहेत. स्थानिक युवकांना रोजगार देण्याबरोबरच या भागात दळणवळणाची अन्य साधनेही निर्माण केली जातील.'' 
 

Web Title: Launch of work of Zozila tunnel in jammu kashmir