जुगार, सट्टेबाजीला मान्यता नको; विधी आयोगाचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
रविवार, 8 जुलै 2018

जुगार आणि सट्टेबाजी सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर करणे अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगाने दिले आहे. 

नवी दिल्ली : जुगार आणि सट्टेबाजी सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर करणे अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगाने दिले आहे. 

विधी आयोगाने जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस केल्याचे वृत्त आले होते. या पार्श्‍वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. आयोगाने म्हटले आहे, की जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करणे सध्याच्या परिस्थितीत अयोग्य असल्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. बेकायदा जुगार आणि सट्टेबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्याची आवश्‍यकता आहे. जुगार आणि सट्टेबाजीवर पूर्णपणे बंदी घालणे शक्‍य नसल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवहार्य पर्याय शोधायला हवा, अशी शिफारस करण्यात आली आहे. 

जुगार आणि सट्टेबाजी यांसारख्या बेकायदा गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालणे शक्‍य नसल्यास याबाबत नियमावली आखण्याची गरज आहे. संसद अथवा राज्यांच्या विधिमंडळांनी या गोष्टींवर नियंत्रण आणण्याबाबत निर्णय घ्यावा. यावर नियंत्रण आणल्यास केवळ उच्च उत्पन्न गटांतील व्यक्तींना जुगार खेळता येईल, अशी शिफारसही करण्यात आल्याचे विधी आयोगाने नमूद केले आहे. 

Web Title: Law Commission of India recommends legalising betting and gambling