वकिलांची वरिष्ठ पोलिस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक

पीटीआय
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षाची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही त्याची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. वकिलांनी कानपूरमधील वरिष्ठ पोलिस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.

कानपूरमध्ये एसएसपी कार्यालयावर दगडफेक, वाहनांची तोडफोड
कानपूर - दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षाची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही त्याची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. वकिलांनी कानपूरमधील वरिष्ठ पोलिस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. 

नौबस्ता येथील एका हॉटेलमध्ये रविवारी वकिलांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसाकडून झालेली मारहाण आणि दिल्लीत पोलिसांनी वकिलांना केलेली मारहाण आदींच्या निषेधार्थ सोमवारी येथील वकिलांनी वरिष्ठ पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयाला घेराओ घातला होता. या वेळी वकिलांनी दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांच्या काचा फोडल्याचे सांगण्यात आले. एका पोलिस कर्मचाऱ्याला वकिलांनी मारहाणही केल्याचा आरोप आहे. 

परस्परांच्या विरोधात तक्रार
या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. हॉटेल व्यवस्थापक आणि पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात १५० वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वकिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस कर्मचारी आणि हॉटेल व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lawyer stone attack on police Superintendent office