तेलंगणात फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग ; 10 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

तेलंगणातील वरंगाळ जिल्ह्यात कोटालिंग गाव आहे. या गावात फटाक्यांचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाला या आगीची माहिती दुपारी दीडच्या सुमारास मिळाली.

हैदराबाद : तेलंगणातील एका फटाक्यांच्या गोदामाला आज (बुधवार) भीषण आग लागली. ही घटना तेलंगणाच्या वरंगाळ (ग्रामीण) जिल्ह्यात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाला असून, 5 जण जखमी आहेत. जखमींना वरंगळा येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

तेलंगणातील वरंगाळ जिल्ह्यात कोटालिंग गाव आहे. या गावात फटाक्यांचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाला या आगीची माहिती दुपारी दीडच्या सुमारास मिळाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या आगीत दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले.  

''जेव्हा ही घटना घडली. त्यावेळी या गोडाऊनमध्ये 15 जण होते. मात्र, यातील 10 जणांचा मृत्यू झाला. फटाक्यांचे गोडाऊन असल्याने ही आग आणखीच भडकली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही'', अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की आग लागण्यापूर्वी मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, 5 जण जखमी झाले आहेत. यातील जखमींना वरंगळा येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: At least 10 killed in Telangana firecracker godown fire