नवरदेवाने मिटले डोळे अन् ती गेली पळून...

leaving husband and elope with married lover at punjab
leaving husband and elope with married lover at punjab

अमृतसर (पंजाब): नवविवाहीत दांपत्य देवदर्शनासाठी गेल्यानंतर तिने प्रियकरासोबत पळ काढल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीतचा 20 ऑक्टोबर रोजी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर माझ्या मनाविरोधात विवाह झाल्याची पत्नी सांगत होती. देवदर्शनासाठी दोघे गेले होते. जोडीने दर्शन घेत असताना नवरदेवाने डोळे मिटल्यानंतर नवरीने पळ काढला. नवनीतने मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही बंद झाला. प्रियकरासोबतच ती पळून गेल्याची शंका नवनीतने वर्तवली आहे. तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास सुरू आहे.

नवनीतने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आमचा विवाह झाल्यापासून पत्नी अजिबातच खूष नव्हती. माझ्या मनाविरोधात विवाह झाल्याचे मला सांगितले. परंतु, तिला समजावून सांगितले. पुढील काही दिवसात तिचे मन रमेल असे मला वाटले होते. तिला फिरवण्याबरोबरच देवदर्शनासाठी गेलो अन् तिने पळ काढला. प्रियकरासोबतच ती पळून गेली आहे. माझी काही चूक नसताना मला मनस्तान सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com