

बंगळूर - कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा हे २००४-२००८ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. महाराष्ट्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. त्यानंतर ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री झाले. त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाली. कृष्णा हे २००९-२०१२ पर्यंत परराष्ट्र मंत्री होते. बदललेल्या राजकीय घडामोडींमध्ये कृष्णा यांना अचानक मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.