काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

श्रीनगर : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या एकाला काश्मीरमध्ये आज (बुधवार) अटक करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय रायफल्स आणि येथील पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. 21 राष्ट्रीय रायफल्सची तुकडी यामध्ये सहभागी झाली होती. 

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून, आशिक अहमद ऊर्फ अबू हैदर असे त्याचे नाव आहे. काश्मीरमधील हंडवाडा भागातील फळांची मंडई असलेल्या परिसरातून आज (बुधवार) सकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले. 'लष्कर-ए-तोयबा'चा या भागात काही कट रचण्यात येत होता किंवा काय याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही. त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: LeT Militant Arrested in Kashmir