ओवेसी म्हणतात, 'पेहले निकाह होगा, फिर लडका या लडकी सोचेंगे'

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

ओवेसींचा ट्विटर ट्रेंड
दरम्यान, ट्विटरवर आज सकाळपासून #IAmAsadOwaisiट्रेंड सुरू आहे. ओवेसी हे पीडितांचे, अल्पसंख्याकांचे आवाज आहे, असे सांगत ट्विटरवर त्यांच्या फोटांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. ओवेसी यांनी अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर आमचा लढा जागेसाठी नाही तर, बाबरी मशिदीसाठी आहे, असे म्हटले होते.

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता समीकरण 180 कोनात बदललंय. मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेना यांच्यात वाद झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे समीकरण उदयास येत आहे. त्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात आमची भूमिका आम्ही आधीच जाहीर केली होती. आम्ही त्यावर ठाम आहोत, असं ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट; राज्यपालांकडून शिफारस

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मु्ख्यमंत्री होणार असेल तर, तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल? यावर ओवेसी म्हणाले, 'पेहले निकाह होगा, उसके बाद सोचेंगे की बेटा होगा या बेटी होगी | अभी तो निकाही नही हुआ है | ये सब खेल हो रहा है |' पक्षाच्या भूमिकेबाबत ओवेसी म्हणाले, 'आम्ही भाजप आणि शिवसेना कोणाच्याही सरकारला पाठिंबा देणार नाही. जर, काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देत असेल तर, मी आनंदी आहे. जनतेलाही कळेल की, कोण कोणासोबत होता आणि कोण कोणाची मते कापत होता.' 

कोण आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी? जाणून घ्या 

ओवेसींचा ट्विटर ट्रेंड
दरम्यान, ट्विटरवर आज सकाळपासून #IAmAsadOwaisiट्रेंड सुरू आहे. ओवेसी हे पीडितांचे, अल्पसंख्याकांचे आवाज आहे, असे सांगत ट्विटरवर त्यांच्या फोटांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. ओवेसी यांनी अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर आमचा लढा जागेसाठी नाही तर, बाबरी मशिदीसाठी आहे, असे म्हटले होते. बाबरी मशिदीच्या जागेच्या बदल्यात देण्यात आलेली पाच एकर जागा नाकारावी, असं मत ओवेसी यांनी मांडलं होतं. आजही पुन्हा त्यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 'आम्हाला पाच एकर जमिनीची खैरात नको आमचा लढा, जागा मिळवण्यासाठी नव्हता.', असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे 'हे' असतील पर्याय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let them have a Nikaah first says Asaduddin Owaisi on possibility of NCP-Sena alliance in Maharashtra