तुम्हीच हे आंदोलन मिटवू शकता- केजरीवालांचे मोदींना पत्र

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन सहकारी कॅबिनेट मंत्री सोमवार (ता.11) सायंकाळी 6 पासून राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनास बसले आहेत. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. तर, आता तुम्हीच हे अंदोलन मिटवू शकता असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

केजरीवाल यांनी लिहलेल्या या पत्रात म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यापासून आयएएस अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या बैठकीला येणे बंद केले आहे आणि त्यामुळे दिल्लीतील कित्येक कामे प्रलंबित आहेत. दिल्लीचे अधिकारी, उपराज्यपाल आणि केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येतात, त्यांचे सगळे अधिकार उपराज्यपालांकडे आहेत. त्यामुळे राज्य सरकारकारला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण ठेवता येत नाही.

केजरीवाल यांनी या पत्रातून अधिकाऱ्यांची तक्रार नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या पत्रात अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याने राज्य सरकारला काम करण्यास येत असलेल्या अडचणींची कैफियत मांडली आहे. या प्रश्नावर उपराज्यपाल किंवा तुम्हीच तोडगा काढू शकता. परंतु, उपराज्यपाल यामध्ये कुठल्याही प्रकारची सकारात्मकता दाखवताना दिसत नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: Letter to Modi from Kejriwal