केजरीवालांना आमचा पाठिंबा : नायब राज्यपाल बैजल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संपुष्टात आल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता बैजल यांनी केजरीवाल यांना पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. याबाबतची माहिती बैजल यांनी ट्विटवरून दिली.

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संपुष्टात आल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता बैजल यांनी केजरीवाल यांना पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. याबाबतची माहिती बैजल यांनी ट्विटवरून दिली.

मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यामध्ये आज (शुक्रवार) बैठक झाली. यामध्ये नायब राज्यपाल बैजल यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांना सांगितले, की "आमचे सहकार्य आणि पाठिंबा कायम तुमच्यासोबत असेल. तसेच सुयोग्य प्रशासन देण्यासही आमचा पाठिंबा असेल.

बैजल यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरूनही दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. आमचा पाठिंबा कायमस्वरूपी तुमच्यासोबत असेल, असे आश्वासन दिले. 

Web Title: LG Anil Baijal assures CM Kejriwal of support