गोव्यात 10 हजार वाहनचालकांचे लायसन्स निलंबित होणार

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

विधानसभेत आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ही माहिती लेखी उत्तरातून दिली. ते म्हणाले, 2017 मध्ये 4207, जानेवारी 2018 ते जुलै 2018 पर्यंत 5799 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याच्या शिफारशी वाहतूक पोलिसांकडून करण्यात आल्या. तसेच 1988 च्या मोटर वाहन कायद्याच्या कलम 19 अंतर्गत कारवाईसाठी या शिफारशी करण्यात आल्या.

पणजी : मागील दीड वर्षांपासून वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गोव्यातील सुमारे 10 हजार ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी 'आरटीओ'कडे केल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. तसेच 2017 मध्ये 4207, जानेवारी 2018 ते जुलै 2018 पर्यंत 5799 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याच्या शिफारशी वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.  

विधानसभेत आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ही माहिती लेखी उत्तरातून दिली. ते म्हणाले, 2017 मध्ये 4207, जानेवारी 2018 ते जुलै 2018 पर्यंत 5799 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याच्या शिफारशी वाहतूक पोलिसांकडून करण्यात आल्या. तसेच 1988 च्या मोटर वाहन कायद्याच्या कलम 19 अंतर्गत कारवाईसाठी या शिफारशी करण्यात आल्या.

या दीड वर्षांच्या कालावधीत तब्बल 6 लाख 87 हजार 885 वाहनचालकांना वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली.

Web Title: The license of 10 thousand drivers will be suspended in Goa