दिवाळीच्या सुटीत गोव्याला जाताय? थांबा! पाहा गोव्यात काय झाले (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालयांमध्ये आज उपस्थिती कमी आहे.

पणजी : महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापुरातील अनेक जण सुटीच्या निमित्ताने गोव्याला जाण्याचे नियोजन करतात. दिवाळीच्या दिवसांत तर हमखास कोकण आणि गोव्याचेच नियोजन केले जाते. पण, यंदाची गोव्यातील दिवाळी वेगळी असणार आहे. अरबी समुद्रात उसळलेल्या क्यार चक्रीवादळामुळे गोव्यात तुफान पाऊस सुरू आहे.

Image may contain: outdoor

Image may contain: plant, house and outdoor

Image may contain: tree, sky, plant, cloud, outdoor, water and nature

गोव्यात शिरले समुद्राचे पाणी; पणजी जलमय 

वादळाची तीव्रता वाढणार महाराष्ट्रात पाऊसच पाऊस 

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालयांमध्ये आज उपस्थिती कमी आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे पणजी आणि किनारपट्टीला लागून असलेल्या शहरांमध्ये रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसत आहे. किनारपट्टी परिसरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. काही ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव इतरत्र हलविण्यात आले आहे. 

Image may contain: one or more people, sky and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life disrupted kyar cyclone impact in goa panjim