विद्यार्थी नेता ते लोकसभा अध्यक्ष; ओम बिर्लांचा राजकीय प्रवास

Om Birla
Om Birla

नवी दिल्ली : राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विद्यार्थी नेता ते लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास असून, त्यांनी आतापर्यंत लढलेल्या पाचही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळविलेला आहे.

सतराव्या लोकसभेत त्यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या जीवनप्रवासाबाबत माहिती दिली. ओम बिर्ला यांच्या कुटुंबियांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून, मला भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत असे त्यांच्या वडीलांनी म्हटले आहे.

ओम बिर्लांच्या कारकिर्दीचा आढावा :
- राजस्थानमधील कोटा शहरात 4 डिसेंबर 1962 ला त्यांचा जन्म झाला
- प्राथमिक शिक्षण कोटामध्ये झाल्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण महर्षी दयानंद कॉलेजमधून पूर्ण
- विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकीय जिवनाला सुरवात
- आतापर्यंत पाच निवडणुका लढल्या, तीन विधानसभा आणि दोन लोकसभा, पाचही ठिकाणी यश
- 2014 मध्ये कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदारपदी निवड
- 2019 मध्ये याचा मतदारसंघातून निवड
- 1992 ते 97 या काळात राजस्थानच्या भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपद
- 2003 विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांती धारिवाल यांचा पराभव केला
- 1977 मध्ये मल्टिपर्पज स्कूलचे ते अध्यक्ष बनले
- कोटातील उद्योग कंपन्यांतून निघणारा धूर आणि बेरोजगारीविरोधात 1977 मध्ये आंदोलन केले
- मंत्री भंवरलाल शर्मा यांचा रस्ता रोखून त्यांच्या गाडीपुढे आडवे झाले होते
- 1982-83 मध्ये कॉलेज अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना करणसिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
- काँग्रेसचे आमदार असलेले करणसिंह म्हणतात, मी एकमेव व्यक्ती आहे ज्याने ओम बिर्ला यांचा पराभव केला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com