सामूहिक बलात्कारप्रकरणी पाच जणांना सक्तमजुरी 

पीटीआय
सोमवार, 4 जून 2018

ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाच दोषींना जलदगती न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

संबलपूर (ओडिशा): ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाच दोषींना जलदगती न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

गेल्या 2 मे रोजी ही सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर जलदगती न्यायालयाने अत्यंत विक्रमी वेळेत या प्रकरणाचा निकाल देत दोषींना शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील सहाव्या आरोपीला न्यायालयाने सुधारगृहात पाठविले आहे. 

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उदयभानू जेना यांनी काल (शनिवारी) या प्रकरणाचा बचाव पक्ष आणि अभियोग पक्षाची 14 तास सुनावणी झाल्यानंतर दिला, अशी माहिती वरिष्ठ सरकारी वकील संतोष पांडा यांनी दिली. पीडित मुलीच्या आईने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, दोन मे रोजी आपली मुलगी शिकवणीहून घरी येताना एका अल्पवयीन मुलाने तिच्याशी संपर्क साधला आणि तिला घेऊन सुनसान जागी गेला तेथे तिच्यावर बलात्कार करून सोडून देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. या तक्रारीनंतर तीन दिवसांत पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. 

Web Title: Life imprisonment of five people in Odisha