पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीचा निर्णय आणि त्यानंतर नव्या नोटा मिळविण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली कसरत या पार्श्‍वभूमीवर अर्थ मंत्रालयाने आज नव्या नोटांच्या उपलब्धतेचा आणि वितरणाचा आढावा घेतला. त्याआधारे घेतलेल्या निर्णयानुसार आता उद्या (सोमवार) पासून लोकांना आपल्या खात्यातून दोन हजारांऐवजी अडीच हजार रुपये काढता येतील. तर नोटा बदलण्याची मर्यादा देखील चार हजारांवरून साडेचार हजार रुपये करण्यात आली आहे. दररोज दहा हजार रुपये बॅंकेतून काढण्याची सवलत बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी आठवड्याला वीस हजार रुपयांऐवजी 24 हजार रुपये काढता येतील. पाचशे रुपयांच्या नव्या नोटाही वितरित झाल्या आहेत.

नवी दिल्ली - नोटाबंदीचा निर्णय आणि त्यानंतर नव्या नोटा मिळविण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली कसरत या पार्श्‍वभूमीवर अर्थ मंत्रालयाने आज नव्या नोटांच्या उपलब्धतेचा आणि वितरणाचा आढावा घेतला. त्याआधारे घेतलेल्या निर्णयानुसार आता उद्या (सोमवार) पासून लोकांना आपल्या खात्यातून दोन हजारांऐवजी अडीच हजार रुपये काढता येतील. तर नोटा बदलण्याची मर्यादा देखील चार हजारांवरून साडेचार हजार रुपये करण्यात आली आहे. दररोज दहा हजार रुपये बॅंकेतून काढण्याची सवलत बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी आठवड्याला वीस हजार रुपयांऐवजी 24 हजार रुपये काढता येतील. पाचशे रुपयांच्या नव्या नोटाही वितरित झाल्या आहेत. बॅंकांनीही कॅशलेस व्यवहारांसाठी ग्राहकांना मोबाईल वॉलेट, डेबिट, क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश सरकारने दिले आहेत. 

  
रुग्णालये, केटरर्स, मंडप व्यावसायिक धनादेश किंवा धनाकर्ष (चेक किंवा डीडी) स्वीकारत नसल्याच्या तक्रारींची सरकारने दखल घेतली आहे. अशा प्रकारे नकार देणाऱ्यांविरुद्ध जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाकडे थेट तक्रार केली जावी, अशी सूचना सरकारने केली आहे. तर, निवृत्ती वेतनधारकांना नोव्हेंबर महिन्याचा हयातीचा दाखला सादर करण्यासाठीची मुदत 15 जानेवारी 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 
 

सरकारने घेतलेल्या आढाव्यातून आढळून आले आहे, की बंदीच्या निर्णयानंतर पहिल्या चार दिवसांत (10 ते 13 नोव्हेंबरपर्यंत) पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांच्या रूपात तब्बल 3 लाख कोटी रुपये बॅंकांमध्ये जमा झाले आहेत. तर 50 हजार कोटी रुपये ग्राहकांपर्यंत एटीएम आणि विथड्रॉवलच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहेत. तर बॅंकांनी 21 हजार कोटी रुपयांचे व्यवहार हाताळले. आता नव्या नोटा उपलब्ध करण्यासाठी सरकारने बॅंका आणि टपाल कार्यालयांना आदेश दिले आहेत. तर, ग्रामीण भागांमध्ये पुरेशा प्रमाणात नोटा मिळाव्यात यासाठी राज्यांच्या मुख्यसचिवांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. ग्राहकांकडून धनादेश (चेक), धनाकर्ष (डीडी) किंवा ऑनलाइन रक्कम न स्वीकारणारी रुग्णालये, केटरर्स, मंडप व्यावसायिक यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. आसाम सरकारने बॅंकांच्या मदतीने काही रुग्णालयांमध्ये तातडीची व्यवस्था म्हणून मोबाईल बॅंकिंग वाहने उपलब्ध करून दिली आहेत. तशा प्रकारे सर्व बॅंकांनी रुग्णांची पैशाअभावी गैरसोय होऊ नये यासाठी महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये मोबाईल बॅंकिंग व्हॅन सुरू कराव्यात. नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी (अपंग) बॅंकांनी पर्यायी रांगांची व्यवस्था करावी. अरुणाचल प्रदेश सरकारने बॅंका आणि सरकारी यंत्रणेच्या सहकार्याने दुर्गम भागात नवी खाती उघडणे, पैसे भरणे किंवा काढणे यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्या धर्तीवर इतर राज्यांनीही नवी खाती सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

Web Title: limit the growth of the money to remove