भू रूपांतरे नियमित करण्यासाठी गोव्यात 31 डिसेंबरपर्यंत मुदत

अवित बगळे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पणजी : झुडुपांखालील जमिनीवर बांधकाम केल्यास ते 31 डिसेंबरपर्यंत विभाग बदल करून नियमित करून घ्यावे. अन्यथा अशा बेकायदा भू रुपांतराविरोधात विकासकांवर 1 जानेवारीपासून पोलिसांकरवी कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. राज्य नगर नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

पर्वरीतील सचिवालय परिषद सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीत मडगाव आणि फोंड्याच्या प्रारूप बाह्य विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली. या बैठकीत भू रुपांतराची 18 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यात विशेषतः धार्मिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रस्तावांचा समावेश होता. यावेळी सरदेसाई म्हणाले, गोव्याचे रुपांतर झोपडपट्टीत होऊ नये यासाठी नियोजनबद्ध विकास हवा. त्यासाठी क्षेत्र बदल करावयाचा असल्यास नगर नियोजन खात्याची परवानगी अनिवार्य केली आहे. काहींनी राहत्या घरांसाठी बागायतींखालील जमिनींचा वापर केला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क भरा आणि क्षेत्र बदल करून घ्या ही योजना आणली आहे. 31 डिसेंबररपर्यंतच त्याअंतर्गत बदल केले जातील. 1 जानेवारीपासून कारवाई सुरु होईल, त्यासाठी खास पथक स्थापले जाईल.

कुंडईच्या तपोभूमीच्या जमीन रुपांतरचे आणि सेवा साधना संस्थेच्या भू रुपांतराच्य प्रस्तावांना आज मान्यता देण्यात आली. महसूल खात्याने एखाद्या भूखंडाची विभागणी केली तरी त्या भूखंडाच्या रुपांतरासाठी नगर नियोजन खात्याकडेच अर्ज करावा लागेल असेही मंत्र्या्ंनी यावेळी स्पष्ट केले. या शुल्क भरा व रुपांतर मिळवा या योजनेच्याविरोधात कॉंग्रेसने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे ल लागले होते. मात्र सरदेसाई यांनी आपण निर्णयावर ठाम असल्याचे दाखवून दिले.

Web Title: limit for land transformation is 31 December in goa