चिमुकलीचे अपहरण करून बलात्कार; एक अटकेत

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)- शामली जिल्ह्यातील खामपूर गावातील एका चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)- शामली जिल्ह्यातील खामपूर गावातील एका चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील नऊ वर्षांची मुलगी रविवारी (ता. 7) सायंकाळी दुकानात गेली होती. यावेळी सेशा सिंग (वय 23) याने चिमुकलीचे अपहरण केले. अपहरणानंतर एका पडक्या घरामध्ये नेऊन त्याने चिमुकलीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या चिमुकलीला घटनास्थळी सोडून तो पसार झाला होता. मुलीच्या घरच्यांनी तिचा शोध घेतल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सिंग याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: littil girl abducted and raped; arrested a

टॅग्स