तहसीलदारांना पेलवेना दोन तालुक्‍यांचा भार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

निपाणी - येथील तहसीलदार महादेव बनसे यांची निपाणी तहसीलदार म्हणून नियुक्ती आहे. पण सध्या बनसे यांच्याकडे निपाणीसह चिक्कोडी तालुक्‍याचा अतिरीक्त कार्यभार आहे. दोन्ही तालुक्‍यातील सुमारे 118 गावातील कार्याची व्याप्ती मोठी असल्याने आता बनसे यांना दोन्हीकडचा कार्यभार पेलवेना झाला आहे.

निपाणी - येथील तहसीलदार महादेव बनसे यांची निपाणी तहसीलदार म्हणून नियुक्ती आहे. पण सध्या बनसे यांच्याकडे निपाणीसह चिक्कोडी तालुक्‍याचा अतिरीक्त कार्यभार आहे. दोन्ही तालुक्‍यातील सुमारे 118 गावातील कार्याची व्याप्ती मोठी असल्याने आता बनसे यांना दोन्हीकडचा कार्यभार पेलवेना झाला आहे.

परिणामी एका तालुक्‍याची जबाबदारी देण्याची मागणी तहसीलदार बनसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 
तालुका झाल्यापासून कायमस्वरुपी तहसीलदाराची प्रतिक्षा येथे आहे. ऑगस्टमध्ये येथे नियुक्त झालेल्या बनसे यांच्याकडे महिनाभरात चिक्कोडी तहसीलदारांची बदली झाल्याने चिक्कोडीचा अतिरीक्त कार्यभार सोपविला आहे. येथील तहसील कार्यालयात सध्या 29 गावांचे महसूलविषयक कामकाज चालते, शिवाय सदलगा सर्कलमधील 14 गावे जोडण्याची प्रक्रीया सुरु आहे. 

या कामकाजात तहसीलदारांचा अंतिम शेरा महत्वाचा असल्याने कार्यालयात त्यांची उपस्थिती महत्वाची आहे. पण चिक्कोडी जुना तालुका असल्याने व निपाणीच्या प्रमाणात चिक्कोडी तालुक्‍याचा अवाका मोठा असल्याने तहसीलदार बनसे यांना चिक्कोडीत अधिक वेळ द्यावा लागत आहे. बऱ्याचवेळा दुपारच्या टप्प्यात येथे येऊन रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला तरी नागरिकांची कामासाठी वर्दळ सकाळच्या वेळी असते.

यावेळी तहसीलदार नसतील तर बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना कामाविना परतावे लागते. नागरिकांचा देखील तहसीलदारांनी पूर्णवेळ येथे काम करण्याचा तगादा आहे. दोन्हीकडचा भार पेलवेना व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अखेर तहसीलदार बनसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका तालुक्‍याची जबाबदारी देण्याची विनंती केली आहे. आता जिल्हाधिकारी आता काय निर्णय देतात व तहसीलदार बनसे कुठे पूर्णवेळ सेवा देतात ते पहावे लागणार आहे. 

दोन्ही तालुक्‍यांचा कार्यभार सांभाळताना कसरत होत आहे. कामाचा विस्तार मोठा असून नागरिकांना तातडीने कामाची अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे एका तालुक्‍याची जबाबदारी देण्याची विनंती केली आहे. 
- महादेव बनसे,
तहसीलदार निपाणी 

Web Title: Load of two talukas on Tahasildar