पश्‍चिम बंगालमधील सात महानगरपालिकांसाठी आज मतदान

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

राज्यातील सात महानगरपालिकांसाठी आज (रविवार) निवडणुका होत असून त्यासाठी सकाळपासून मतदान सुरू आहे.

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) : राज्यातील सात महानगरपालिकांसाठी आज (रविवार) निवडणुका होत असून त्यासाठी सकाळपासून मतदान सुरू आहे.

राज्यातील दार्जिलिंग, कालिमपोंग, मिरिक आणि कुर्सेओंग या पर्वतीय परिसरातील चार महानगरपालिकांसह दामकोल, रायगोंग आणि पुजानी या तीन अशा एकूण सात महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी सुरक्षा म्हणून स्थानिक पोलिस, स्वयंसेवकांसह केंद्रीय सुरक्षा पथकही तैनात करण्यात आले आहे. या निवडणुकासाठी गोरख जनमुक्ती मोर्चाविरूद्ध तृणमूल कॉंग्रेस आणि गोरख नॅशनल लिबरेशन फ्रंटने आघाडी केली आहे.

दार्जिलिंगमध्ये एकूण 32 जागा असून 95 उमेदवार आपले रिंगणात आहेत. तर कुर्सेओंग येथे 20 जागांसाठी 57 उमेदवार, मिरिक येथे 9 जागांसाठी 34 उमेदवार आणि कालिमपोंग येथे 23 जागांसाठी 102 उमेदवार स्पर्धेत आहेत.

Web Title: Local body polls begin for 7 municipal bodies