काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; हामिद लल्हारीचा समावेश

kashmir
kashmir

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, यामध्ये अंसर-गजवात-उल-हिंद (एजीएच) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हामिद लल्हारीचा समावेश आहे.

जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की भारतीय लष्कराने अनंतनागमध्ये केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. खात्मा करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांची नावे नवीद ताक, हमीद लोन ऊर्फ हामिद लल्हारी आणि जुनैद भट अशी आहेत. हामिद लल्हारी हा अंसर-गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होत्या. अल् कायदा आणि छोट्या-छोट्या दहशतवादी संघटना मिळून आता काम करत आहेत.

रविवारी भारतीय लष्कराने उखळी तोफांचा मारा करून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने सीमेवरून घुसखोरी प्रयत्न झाले होते. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय दहशतवाद्यांना मदत करत आहे. काश्मीरमधील युवकांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे आता युवकांनी आपला मार्ग निवडावा. तसेच आम्ही दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सदैव तयार आहोत, असे दिलबाग सिंह यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com