Coronavirus : तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर तुफान दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Locals of Tatpatti Bakhal in Indore pelt stones at health workers
Locals of Tatpatti Bakhal in Indore pelt stones at health workers

इंदोर : संशयित कोरोनाग्रस्त म्हणून तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर तुफान दगडफेक केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदोर शहरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी काल (ता.०१) तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकावर तुफान दगडफेक केली. हे पथक बुधवारी दुपारी तपासणीसाठी तत्काळ बखल इथे दाखल झाले होते. तपासणी साठी आलेल्या पथकाचा निषेध करत रहिवाशांनी पोलिसांचे बॅरिकेट तोडून टीमवर दगडफेक केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यानंतर प्रकरण शांत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले. वैद्यकीय पथक आणि स्थानिकांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. लोकांनी निषेध करत या पथकावर तुफान हल्ला केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुग्णाची संख्या वाढत असतानादेखील लोक अशा अदखलपात्र चुका करत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. 

Coronavirus : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णाची तपासणी करण्यासाठी हे पथक इंदूरमधील टाटापट्टी दाखल परिसरात पोहोचले. त्याचवेळी तिथल्या नागरिकांनी हुज्जत घालत त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. लाठ्या-काठ्या आणि पाईप घेऊन तिथल्या नागरिकांनी वैद्यकीय पथकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात 2 डॉक्टर जखमी झाले आहेत. इंदूर आणि छतरीपुरा या परिसरात दगडफेक आणि मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 12 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा मध्य प्रदेशातील आकडा 75 वर पोहोचला आहे. या पैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. 6 नवीन परिसरातील हे रुग्ण आढळल्यानं आता चिंता व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com