रेल्वे स्टेशनवर पॅकेटसाठी प्रवाशांमध्ये राडा...

वृत्तसंस्था
Tuesday, 26 May 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असल्यामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. चौथ्या लॉकडाऊनदरम्यान नियम शिथील करण्यात आले असून, अनेकजण आपल्या घरी परतताना दिसत आहेत.

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असल्यामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. चौथ्या लॉकडाऊनदरम्यान नियम शिथील करण्यात आले असून, अनेकजण आपल्या घरी परतताना दिसत आहेत. एका रेल्वेस्टेशनवर अन्नाच्या पॅकेटसाठी प्रवाशांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे. यावरून बिकट परिस्थीतीची जाणीव होते.

क्वारंटाईन सेंटरमध्ये घुसला साप अन्...

देशात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. अनेकजण या विशेष रेल्वेने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान इटारसी स्टेशनवर (मध्य प्रदेश) एक धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. खाद्यपदार्थांच्या पॅकेटसाठी रेल्वे स्टेशनवर जोरदार राडा केला. रेल्वेतील भुकेलेल्या प्रवाशांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इटारसी जंक्शनवर सकाळी साधारण आठ वाजता श्रमिक रेल्वे पोहचली. या रेल्वेतील प्रवाशांसाठी काही ब्रेडची पॅकेटस एका ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आली होती. जवळपास तीन बोगींमधील प्रवासी खाद्यपदार्थ पाहून स्टेशन प्लॅटफॉर्मवर उतरले.

नवरी म्हणाली; काही झालं तरी लग्न करणारचं अन्...

रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बोगींमध्ये परत जाण्यास सांगितले. मात्र, एका प्रवाशाने पॅकेट उचलून पळण्यास सुरुवात केली. इतर प्रवाशांही अशाच पद्धतीने खाद्यपदार्थ पटापट उचलण्यास सुरुवात केली आणि गोंधळ उडाला. पॅकेटवरून प्रवासी आपापसात भिडले आणि स्टेशनवर एकच राडा झाला. काही दिवसांपूर्वी बिहारच्या कटिहार स्टेशनवर बिस्किटांच्या पुड्यांसाठी रेल्वे स्टेशनवर जोरदार राडा झाल्याची घटना घडली होती.

Video: भूकेपोटी मजूर अक्षरशः तुटून पडले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lock down migrant labour snaches food items itarsi station