लॉकडाउनमुळे राजधानीतून ८ लाख मजुर परतले स्वगृही

राजधानी नवी दिल्लीत लॉकडाउनमुळे चार आठवड्यात सुमारे ८ लाख मजुरांनी स्थलांतर केल्याचे दिल्ली सरकारच्या अहवालात म्हटले आहे.
Labour Migration
Labour MigrationSakal

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीत (Delhi) लॉकडाउनमुळे (Lockdown) चार आठवड्यात सुमारे ८ लाख मजुरांनी (Worker) स्थलांतर (Migration) केल्याचे दिल्ली सरकारच्या अहवालात (Report) म्हटले आहे. त्यापैकी निम्मे मजुर हे पहिल्या आठवड्यातच स्वगृही परतल्याचे म्हटले आहे. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे (Corona Disaster) स्थलांतरित करणाऱ्या मजुरांसाठी बस आणि विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. (Lockdown 8 Lakh Workers Returned Home from Delhi)

कोरोनाची लाट रोखण्यासाठी राजधानीत १९ एप्रिल रोजी लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यानंतर राजधानीतून अस्थायी मजुर आपल्या गावी परतली लागले. चौदा मे पर्यंत सुमारे ८०७,०३२ मजूर दिल्लीतील तीन आंतरराज्यीय स्थानकातील बसच्या मदतीने गावी गेले. या बसची व्यवस्था दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने केली आणि याशिवाय जादा बसही सोडण्यात आल्या. परिवहन विभागाच्या अहवालात म्हटले की, दिल्ली सरकारने शेजारील राज्यात विशेषत: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या परिवहन अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून सुमारे ८ लाख मजुरांना कोणत्याही अडचणीशिवाय स्वगृही जाण्यास मदत केली. आंतरराज्यीय बसचे संचलन आणि मालकी राज्य सरकारकडे असल्याने जादा तिकीट आकारल्याची तक्रार झाली नाही.

Labour Migration
'चला, वाजवा थाळ्या', ब्लॅक फंगससाठीही मोदी लवकरच करतील घोषणा

१९ एप्रिल रोजी दिल्लीत विकएंड संचारबंदीचे रूपांतर सहा दिवसांच्या संपूर्ण लॉकडाउनमध्ये झाले. त्यावेळी शहरात दररोज सरासरी २० हजार रुग्ण आढळून येत होते. चाचणी करणारा प्रत्येक तिसरा व्यक्ती हा कोरोनाबाधित असल्याचे आढळून येत होते. दिल्ली आणि परिसरातील रुग्णालय रुग्णांनी भरून गेली आणि ऑक्सिजन व औषधांची टंचाई भेडसावू लागली. तेव्हापासून लॉकडाउन चार वेळेस वाढवण्यात आला. आता संक्रमणाचा दर कमी झाला आहे. आतापर्यंत स्थलांतरित मजुरांसाठी २१,८७९ बसच्या फेऱ्या झाल्या आणि त्यापैकी ८०७४ फेऱ्या पहिल्या आठवड्यातील होत्या.

दुसऱ्या लाटेच्या काळात राजधानीतील मजुरांच्या स्थलांतरित प्रक्रियेला योग्य रीतीने हाताळण्यात आले. तसेच सर्वांसाठी मोफत भोजनाची सोय केली जात आहे. उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळांचा देखील सक्रिय सहभाग राहिला. दिल्लीत लॉकडाउन लागू होताच मोठ्या प्रमाणात बसची सोय केली.

- कैलास गेहलोत, परिवहन मंत्री, दिल्ली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com