#HappyLohri पंजाबी बांधवांच्या 'लोहरी'ची उत्साहात सुरवात!

वृत्तसंस्था
Monday, 13 January 2020

पंजाबसह उत्तर भारतात आज (ता. 13) लोहरी हा सण उत्साहात साजरा केला जाईल. हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच भोगी दिवशी साजरा केला जातो.

नवी दिल्ली : पंजाबसह उत्तर भारतात आज (ता. 13) लोहरी हा सण उत्साहात साजरा केला जाईल. हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच भोगी दिवशी साजरा केला जातो. पंजाबी बांधवांमध्ये मुख्यतः या सणाचे महत्त्व असते. भोगीचा दिवस सर्व राज्यात साजरा केला जातो, मात्र या सणाला पंजाबमध्ये लोहरी असे नाव आहे.

अशी साजरी करतात लोहरी...
लोहरीच्या दिवशी संध्याकाळी सगळेजण एकत्र येऊन, मोठी शेकोटी पेटवतात. होळीप्रमाणे त्याची पूजा करतात. एकत्र आलेले सगळेजण या शेकोटीभोवती बसतात, गाणी म्हणतात, नृत्य (भांगडा) करतात, गप्पा मारतात. त्यानंतर एकत्र बसून खमंग फरालाचा आस्वाद घेतला जातो. रेवडी, भाजलेले शेंगदाणे, तिळाची वडी अशा चविष्ट खाद्यावर सगळे एकत्र ताव मारतात. लोहरीचा सण हा माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी साजरा केला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for lohri

नवविवाहीत जोडप्यांसाठी व नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी लोहरीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यांची पहिली लोहरी ही धुमधडाक्यात साजरी केली जाते. तसेच नवविवाहीत व नुकतेच पुत्रप्राप्ती झालेल्या कुटूंबाकडून पैसे घेऊन लहान मुले सर्व परिसराला रेवडी वाटतात व आनंद साजरा करतात. लोहरी हा सण पंजाबी व हरियानातील बांधवांचा मुख्य सण आहे. तसेच दिल्ली, जम्मू-काश्मीर और हिमाचलमध्ये धूमधामात साजरा केला जातो.

Image

लोहरीच्या निमित्ताने आज सोशल मीडियावरही #HappyLohri हा हॅशटॅग ट्रेंडिंग होतोय. तसेच राजकारण्यासंह अनेक दिग्गजांनी लोहरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक

 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lohri celebration in north India today