Loksabha 2019 : अखेरच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरवात 

वृत्तसंस्था
रविवार, 19 मे 2019

पंजाब, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि चंडीगडमध्ये आज मतदान होत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजीत आज विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यासाठी आज (ता. 19) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. आठ राज्ये आणि 59 मतदारसंघांचा समावेश असलेल्या या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ आहे.

पंजाब, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि चंडीगडमध्ये आज मतदान होत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजीत आज विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. तमिळनाडूतही विधानसभेच्या चार जागांसाठी आज पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे. 

918 
उमेदवार 

10.01 कोटी 
मतदार 

1.12 लाख 
मतदान केंद्रे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lok Sabha Election 2019 Phase 7 voting on 59 seats today