'इस्लाम विरुद्ध भगवान; पाकिस्तान विरुद्ध भारत'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

बलिया (उत्तर प्रदेश): आगामी लोकसभा निवडणूक ही इस्लाम विरुद्ध भगवान व पाकिस्तान विरुद्ध भारत अशी पहायला मिळेल, असे उत्तर प्रदेशचे आमदार सुरेंद्रसिंग यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सुरेंद्रसिंग म्हणाले, '2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक ही इस्लाम विरुद्ध भगवान व पाकिस्तान विरुद्ध भारत अशी होणार आहे. यामुळे देशातील नागरिकांनी इस्लाम जिंकेल की भगवान जिंकेल याबाबत निर्णय घ्यायला हवा.'

भाजपचे आमदार कुलदिपसिंग सेंगार यांच्यावर गेल्या वर्षी बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यावर बोलतानाही सुरेंद्रसिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'मानसतज्ज्ञांच्या नजरेतून पाहिले तर तीन मुले असलेल्या महिलेवर कोणी वाईट कृत्य कसे करू शकेल? पीडित युवतीच्या वडिलांना कोणी मारहाण केली असेल हे मी मान्य करू शकतो पण बलात्काराची गोष्ट मान्य करू शकत नाही.'

दरम्यान, भाजपचे आमदार एकामागून एक वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणत आहेत.

Web Title: Lok Sabha polls will see Islam vs Bhagwan Pakistan vs India BJP MLA