भाजप खासदारांचे लोकसभेतील इशारे पाहून तुम्ही व्हाल थक्क (व्हिडिओ)

भाजप खासदारांचे लोकसभेतील इशारे पाहून तुम्ही व्हाल थक्क (व्हिडिओ)

नवी दिल्ली- लोकसभेत सवर्ण आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा चालू असताना, भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर यांनी विचित्र इशारे केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संसदेत गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना किरण खेर यांनी केलेल्या अशा गोष्टींमुळे सोशल मिडियावर त्यांना नेटिझन्स ट्रोल करताना दिसत आहेत.

चंदीगडच्या लोकसभेच्या जागेवरून निवडून आलेल्या किरण खेरचे संसदेतील हे वागणे अनेक जणांना खटकले आहे. खेर या विचित्र इशारे करत असल्याचे या व्हिडिओमधून आपल्याला स्पष्ट दिसत आहे. काही नेटीझन्सनी तर किरण खेर यांना 'इंडिया गॉट टॅलेंट' असेही म्हटले आहे. 


लोकसभेत हे काय काय चालतं आणि नेटीझन्सनी ट्रोल केलेले व्हिडिओ पाहून हसू तर नक्की होईल. पण यावर अनेकांकडून आता संतापदेखील व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडूनही त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com