लोकमान्य टिळक 'दहशतवादाचे जनक' 

Lokmanya Tilak
Lokmanya Tilak

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या सुरवातीच्या काळात जनमानसांत इंग्रजांविरुद्ध अंसतोषाचा अंगार फुलविणारे व "असंतोषाचे जनक' म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना "दहशतवादाचे जनक' (फादर ऑफ टेरेरिझम) ठरविण्यात आले आहे. राजस्थानमध्ये इंग्रजी माध्यमातील आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात अशा प्रकारे लोकमान्यांचा अपमान केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आले आहे. 

या पुस्तकाचे प्रकाशन मथुरेतील एका प्रकाशन संस्थेने केले आहे. प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकातील प्रकरण 22 मधील "इन्सिडंट्‌स ऑफ नॅशनल मूव्हमेंट ड्युरिंग एटिंन्थ अँड नाईटिन्थ सेंच्युरी' (अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळीतील घटना) या शीर्षकाखाली दिलेल्या माहितीत पान क्र.267 वर लोकमान्य टिळक यांची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, टिळक डेमॉन्स्ट्रेटेड अ पाथ टुवडर्स नॅशनल मूव्हमेंट. सो ही इज कॉल्ड ऍज द "फादर ऑफ टेरेरिझम' (टिळक यांनी राष्ट्रीय चळवळीला मार्ग दाखविला. म्हणून त्यांना "दहशतवादाचे जनक' असे संबोधले जाते) असे अवमानकारक वाक्‍य छापले आहे. 

टिळकांचा अशा प्रकारे उल्लेख प्रसिद्ध झाल्याने राजस्थानमधील इतिहासतज्ज्ञांनी खंत व्यक्त केली आहे. हे पुस्तक अजमेर शाळेतील विद्यार्थी वापरतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेहरू, गांधी व विनायक दामोदर सावरकर यांचे योगदानाकडे दुर्लक्ष केल्याने यापूर्वीही येथील पाठ्यपुस्तकांबद्दल वाद निर्माण झाले आहेत. पाठ्यपुस्तके बदलून शिक्षणाचे खासगीकरण करीत असल्याची टीका कॉंग्रेसने भाजप सरकारवर वेळोवेळी केली आहे. 

पुस्तकाबद्दल मते.. 
अजमेर शाळेचे मुख्याध्यापक ः शाळेत आपण नव्याने रुजू झाल्याने प्रकाराबाबत आपल्याला माहीत नाही; पण याप्रकरणी लक्ष घालून निश्‍चितपणे कारवाई करू. 

विद्यार्थी ः राजस्थान शिक्षण मंडळ केवळ हिंदी भाषेतून पाठ्यपुस्तके छापतात. कोणतेही इंग्रजी माध्यमातील पुस्तक उपलब्ध नसल्याने हे संदर्भ पुस्तकच आम्हाला वापरावे लागते. 

स्टुडंट ऍडव्हाझर पब्लिकेशन ः राजस्थान शिक्षण मंडळाच्या नियमांनुसारच आम्ही हे पुस्तक छापले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com