Loksabha 2019 : जनतेचा विश्‍वासच चौकीदाराचे भांडवल - मोदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

चिक्कोडी - देशात राष्ट्रवाद पाहिजे की वंशवाद हे मतदारांनी ठरविण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्‍वास, प्रेम हेच चौकीदाराचे भांडवल आहे. नवमतदार, शेतकरी, मध्यमवर्गीय व सामान्य वर्गाने समस्या निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले व बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश अंगडी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. गुरूवारी सायंकाळी येथील बी. के. महाविद्यालयासमोर असलेल्या पटांगणावर ही सभा झाली.

मोदी यांनी सर्वप्रथम महात्मा बसवेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा, बेळवडी मल्लम्मा, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे स्मरण केले. त्यावेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता.

मोदी म्हणाले, ‘‘नवमतदारांच्या आकांक्षांची झेप, शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढणे, मध्यमवर्गीयांना कराची सवलत, सामान्यांना स्वस्ताई हवी असल्यास भाजपलाच मतदान करण्याची गरज आहे. भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याची गरज असून ते आपण करीत असून विरोधकांची टोळी याचा विपर्यस्त अर्थ लावत आहे.’’

कर्नाटकातील युती सरकारचा समाचार घेताना ते म्हणाले, ‘‘हे सरकार मतगठ्ठ्याचा स्वतःसाठी वापर करीत आहे. युतीत सतत वाद आहेत; पण मोदींवर टीका करणे, राष्ट्रवादाला नावे ठेवणे, वंशवादाचे समर्थन करणे, मोदींना शिव्या देण्यावर दोघांचे एकमत आहे. कर्नाटकातील युती सरकारने केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेसाठी कमी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.’’
 
Web Title: Loksabha 2019 Narendra Modi comment