Loksabha 2019 : लोकसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अमेठीतून राहुल, तर रायबरेलीतून...

Rahul gandi  Amethi and Sonia gandhi Rae Bareli Will contest the election
Rahul gandi Amethi and Sonia gandhi Rae Bareli Will contest the election

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज उत्तर प्रदेश (यूपी) आणि गुजरात या दोन राज्यांसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतून, तर त्यांच्या मातु:श्री आणि "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुजरातमधील चार आणि उत्तर प्रदेशातील अकरा जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. 

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षात आघाडी झाली असून, यामध्ये कॉंग्रेसला स्थान नसल्याने पक्षश्रेष्ठींनी एकट्यानेच पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार केला आहे. "यूपी'तील सतरा जागांवर कॉंग्रेस ताकद लावणार असून, अन्य नऊ जागा मित्रपक्षांच्या सहकार्याने जिंकण्याचा श्रेष्ठींचा इरादा आहे. ताज्या यादीमध्ये सहारनपूर येथून इम्रान मसूद, धौरहरा येथून जितीन प्रसाद, फर्रूखाबादेतून सलमान खुर्शीद आणि कुशीनगरमधून आर. पी. एन. सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातेत आनंद येथून भरतसिंह सोळंकी आणि बडोद्यातून प्रशांत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभेसाठी महाराष्ट्रातील उमेदवार निश्‍चित करण्यासाठी उद्या (ता. 8) केंद्रातील नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत मुंबईतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.

हार्दिक काँग्रेसमध्ये जाणार 
गुजरातमधील राजकारणात कॉंग्रेसचे हात आणखी बळकट होण्याची शक्‍यता वर्तविली जात असून, पाटीदार नेते हार्दिक पटेल बारा तारखेच्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीनंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. हार्दिक यांच्या आगमनाने कॉंग्रेसला मोठे बळ मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com