निवडणुका महाग

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

नवी दिल्ली - निवडणुकीतील वाढता खर्च लक्षात घेता २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचा आणि उमेदवारांचा खर्च ५० ते ६० हजार कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची शक्‍यता बिगर सरकारी संस्था व ‘थिंग टॅंक सर्वेक्षण सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे.

यंदा कर्नाटक विधानसभा निवडणूक देशातील सर्वांत महागडी निवडणूक ठरली आहे. या निवडणुकीवर विविध पक्षांनी केलेल्या खर्चाचा आकडा ९,५०० ते १०,५०० कोटी रुपयांदरम्यान आहे. देशात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चात ५५ ते ६० टक्के वाढ, तर राजकीय पक्षांच्या खर्चात २९ ते ३० टक्के वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे.

निवडणूक पैसा खाणारी ठरली
कर्नाटकमधील ही निवडणूक पैसा खाणारी ठरली, असे वर्णन ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने केले आहे. कर्नाटकसह अन्य राज्यात गेल्या २० वर्षांत झालेल्या निवडणूक खर्चाचा अभ्यास केला आहे. या पाहणीत पंतप्रधानांच्या प्रचार दौऱ्यावर झालेल्या खर्चाचा समावेश केला नसल्याचा दावा संस्थेने केला आहे. संपूर्ण निवडणुकीतील खर्चात उमेदवारांचा वाटा ७५ टक्के आहे. गेल्या २० वर्षांतील आकडेवारीनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर झालेला खर्च हा देशातील अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकीवरील खर्चापेक्षा जास्त आहे.

Web Title: loksabha election money