शरद यादव यांच्या मुलीचा आज काँग्रेस प्रवेश, निवडणूकही लढवणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी फोन करुन यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तेव्हापासून राजकीय वर्तुळात शरद यादव हे पुन्हा एकदा जेडीयूत परतणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. 

पाटणा Bihar Election 2020- एकेकाळी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आणि सध्या लोकतांत्रिक जनता दलचे प्रमुख शरद यादव यांची कन्या आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. सुभाषिनी राज राव दिल्ली येथील पक्ष कार्यालयात दुपारी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. सुभाषिनी या बिहार विधानसभा निवडणूकही लढवणार आहेत. त्यांना बिहारीगंज मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, शरद यादव हे पुन्हा एकदा जेडीयूत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. सध्या आजारी असलेले यादव यांना एम्समधून घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी फोन करुन यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तेव्हापासून राजकीय वर्तुळात शरद यादव हे पुन्हा एकदा जेडीयूत परतणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. 

सुमारे तीन वर्षांपूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याने शरद यादव यांना जेडीयूतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी लोकतांत्रिक जनता दल (एलजेडी) पक्षाची स्थापना केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष महाआघाडीत सामील होता. त्यावेळी यादव यांनी मधेपुरामधून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 
हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाची इम्रान यांना नोटीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loktantrik Janata Dal chief Sharad Yadav's daughter Subhashini Raj Rao to join Congress