Video : बंदुकीचा धाक दाखवून फ्लिपकार्टच्या गोडावूनला चोरट्यांनी लुटलं; पहा व्हिडीओ

loot in flipkart
loot in flipkart

उत्तर प्रदेश :  उत्तर प्रदेशातील रामपुरमध्ये काही लुटेऱ्यांनी बंदुकीचा धाक दाखवून फ्लिपकार्टच्या गोडावूनमधून लाखो रुपयांची लूट केली आहे. या दरोड्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे की, काही लोक बाईकवरुन गोडावूनमध्ये येतात आणि काही वेळाने ते गडबडीत गोडावूनमधून पुन्हा आपल्या गाडीवरून निघून जातात. यावेळी या चोरट्यांनी आपल्या चेहऱ्याला कापडाने संपूर्णत: झाकले देखील होते. 

बाहेर पडताच हे चोरटे अगदी शिताफीने पुन्हा आपल्या गाडीवर बसून फरार होतात. याबाबतचे वृत एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. गोडावूनच्या इनचार्जने सांगितलं की, काही हत्यार हातात असणारे चोरटे बाईकवरुन आले आणि त्यांनी हत्यारांचा धाक दाखवून आमची 7 ते 7.50 लाखाचे कॅश ऑन डिलीव्हरीचे पैसे लूटून घेऊन गेले. 


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिव्हील लाईनमधील कोतवाली भागातील ज्वाला नगरमध्ये घडली आहे. सणासुदीचे दिवस असल्याकारणाने कंपनीला मोठ्या प्रमाणावर ऑर्डरदेखील प्राप्त होत आहेत. शनिवारी रात्री दहा वाजता कंपनीचे काही कर्मचारी हिशेबाचे काम करत होते. 

हेही वाचा - Bihar Election : बिहारमध्ये 'जंगलराज'वाले आणि नक्षलवादी एकत्र; मोदींची महाआघाडीवर टीका
या दरम्यानच बाईकवरुन पाच चोरटे कंपनीच्या कार्यालयात घुसले. कंपनीच्या ऑफिसमधील उपस्थित कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, या पाचही लुटारुंच्या हातात बंदूक होती. लुटारुंनी बंदूकीचा धाक दाखवून त्यांना एका बाजूला बसवलं आणि तिथे असणारे नऊ लाख रुपये लुटून ते फरार झाले. 
या बदमाशांनी पैसे लुटून फरार झाल्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला. तेंव्हा आसपासचे काही लोक जमले आणि मग पोलिसांना बोलावलं गेलं. पोलिसांनी आता तपास सुरु केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com