'क से कृष्णा, क से कोरोना'; काँग्रेस नेत्यानं दिलं स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातच उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुर्यकांत धस्माना यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी एका टीव्ही चॅनलवर चर्चेवेळी भगवान कृष्णाने कोरोना पाठवला असं म्हटलं होतं. 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातच उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुर्यकांत धस्माना यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी एका टीव्ही चॅनलवर चर्चेवेळी भगवान कृष्णाने कोरोना पाठवला असं म्हटलं होतं. आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. धस्माना टीव्हीवरील चर्चेवेळी म्हणाले होते की, श्रीकृष्णाने म्हटलंय की ते जगातचे निर्माता, पालक आणि संहारक आहेत. त्यांनीच कोरोना पाठवला आहे. क पासून कृष्ण आणि क पासून कोरोना असंही त्यांनी वक्तव्य केलं होतं. 

हे वाचा - सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

धस्माना स्पष्टीकरण देताना म्हणाले, मी असं बोललो की भगवान श्रीकृष्णांनी गितेत असं सांगितलंय की सृष्टीचा निर्माता आणि संहारक मी आहे. धस्माना म्हणतात की, मी माझ्या आयुष्यात गीतेत सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणतो. जिथंही जातो तिथं गीतेतली उदाहऱणं देत असतो. मी उपासक आहे आणि कृष्णाचे उदाहरण देतो. जगात काहीही होऊदे ते कृष्णाच्या हातात आहे. हानी, लाभ, जीवन, मरण हे सगळं त्या इश्वराच्याच हातात आहे. आता कोणी याचं खंडन करावं. जे काही मिळेल ते देवामुळेच हे मी सांगत होतो पण त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असं धस्माना म्हणाले. 

सुर्यकांत धस्माना हे चारधान यात्रा सुरु करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत होते. टीव्ही चॅनेलवरील चर्चेत ते काँग्रेसकडून सहभागी झाले होते. कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या धार्मिक यात्रा सुरु करण्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला होता. ते म्हणाले होते की, यामुळे इतर राज्यातील लोक केदारनाथला जाण्यासाठी उत्तराखंडमध्ये येतील आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढेल. 

हे वाचा - धक्कादायक : चिनी कंपन्यांकडून, पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी

नुकतंच धस्माना यांनी पतंजलीच्या वादावरून भाजप सरकारला घेरलं होतं. ते म्हणाले होते की, भाजपकडून रामदेव बाबा यांना वाचवलं जात आहे आणि आमच्यावर टीका केली जात आहे. कोरोनावरील औषधामुळे बाबा रामदेव चर्चेत आले होते. रामदेव बाबा यांच्या कोरोनिलच्या प्रचारावर सध्या आयुष मंत्रालयाने स्थगिती आणली आहे. काँग्रेसनं आरोप केला आहे की, भाजप रामदेव बाबांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lord krishna sent corona congress leader dhasmana explain what he talk