पुरामध्ये झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे : पी. विजयन

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

 ''40 हजार हेक्टरवर लावण्यात आलेली पीकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. 2 लाखांहून अधिक पोल्ट्री आणि सुमारे 46 हजार प्राण्यांचा या आपत्तीमध्ये जीव गेला आहे. या पुराने मोठ-मोठ्या इमारती, दुकाने उद्धवस्त झाली आहेत. तसेच अनेक पूल कोसळले आहेत. पॉवर सेक्टरमध्ये सुमारे 750 कोटींचे नुकसान झाले''.  

- पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

नवी दिल्ली : केरळमध्ये पडणारा मुसळधार आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. राज्यात आत्तापर्यंत 250 हून अधिक जणांचा जीव गेला. त्यानंतर यावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले, की "केरळमधील पुरापासून बचाव करण्यासाठी विशेष रितीने मदतीची गरज आहे. तसेच राज्यात आलेल्या पुरामध्ये झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे''.

गेल्या अनेक दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात पुराने थैमान घातले आहे. या पुरापासून लोकांचा बचाव करण्यासाठी विविध यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच पुरामुळे होत असलेल्या हानीमुळे जीवनमान व्यतित करण्यात अडचणी येत आहेत. राज्यातील नागरिकांना देशभरातून 'मदतीचे हात' मिळत आहेत.

या संपूर्ण नैसर्गिक आपत्तीबाबत मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले, की ''40 हजार हेक्टरवर लावण्यात आलेली पीकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. 2 लाखांहून अधिक पोल्ट्री आणि सुमारे 46 हजार प्राण्यांचा या आपत्तीमध्ये जीव गेला आहे. या पुराने मोठ-मोठ्या इमारती, दुकाने उद्धवस्त झाली आहेत. तसेच अनेक पूल कोसळले आहेत. पॉवर सेक्टरमध्ये सुमारे 750 कोटींचे नुकसान झाले''.    

दरम्यान, केरळमधील नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या सुमारे 14 लाख नागरिकांसाठी 4 हजारांहून अधिक मदतकेंद्रांची स्थापना करण्यात आली. यातील अनेकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे. बचावकार्य आता अंतिम टप्प्यात येत आहे, असेही विजयन यांनी सांगितले.  

Web Title: loss in flood incomparable says CM Pinarayi Vijayan