दोन लाख डॉलरसह गर्लफ्रेंडही हातची गेली 

दोन लाख डॉलरसह गर्लफ्रेंडही हातची गेली 

नवी दिल्ली : गर्लफ्रेंडला प्रपोज करताना भेट देण्यासाठी नीरव मोदीकडून खरेदी केलेल्या दोन हिरेजडित अंगठ्या बनावट निघाल्याने कॅनडातील एका तरुणाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. 

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बॅंकेत केलेल्या गैरव्यवहाराची पुसटशी कल्पनाही नसलेल्या कॅनडातील पॉल अल्फोन्सो याने हॉंगकॉंगमध्ये नीरवकडून 2 लाख डॉलरच्या (दीड कोटी रुपये) दोन हिरेजडित अंगठ्या खरेदी केल्या होत्या. पॉल या अंगठ्या त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करताना भेट म्हणून देणार होता. तसे झालेही; मात्र कालांतराने या अंगठ्या बनावट असल्याचे समोर आले. पॉलच्या गर्लफ्रेंडने याचा दोष पॉललाच देत विवाहास नकार दिला. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पॉलचे विवाहाचे स्वप्नही भंगले आणि पैशावरही पाणी सोडावे लागले. 

एका बड्या कंपनीत सीईओ असलेला पॉलची लॉस एंजलीसमध्ये 2012 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नीरव मोदीशी भेट झाली होती. एप्रिल 2018 मध्ये ते भेटले तेव्हा पॉलने नीरवकडे अंगठीबाबत विचारणा केली. त्यानंतर नीरवने विविध डिझाइन पाठविल्या होत्या. प्रेयसीने दोन अंगठ्यांमध्ये रस दाखविल्यानंतर पॉलने या अंगठ्यांची ऑर्डर दिली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पॉलने याप्रकरणी कॅलिफोर्नियातील न्यायालयात तक्रार दाखल करीत चार लाख डॉलरच्या भरपाईची मागणी केली आहे. 

असे उघडे पडले पितळ 
खरेदी केलेल्या अंगठ्यांच्या प्रमाणपत्राबाबत पॉलने नीरवकडे तगादा लावला होता. नीरव याविषयी चालढकल करत होता. ऑगस्ट महिन्यात पॉलच्या गर्लफ्रेंडने जाणकाराकडून अंगठ्यांची पारख करून घेतली. तेव्हा त्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले. याचा जाब विचारणारे अनेक ई-मेल पॉलने नीरवला पाठविले. मात्र, काही उत्तर मिळाले नाही. अशात नीरवने केल्या गैरव्यवहाराचीही माहिती पॉलला मिळाल्यानंतर त्याच्या पायाखालची वाळू सरकली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com