पत्नी गेली प्रियकरासोबत पळून; पतीने कापला प्रियकराच्या वडिलांचा हात

दुकानात तलवारी घेऊन घुसला आणि कैलास मेनारिया यांच्यावर हल्ला केला
pune crime
pune crimesakal

राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूर येथील एका इसमाची पत्नी प्रियकरासोबत (Love Affair) पळून गेली. यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकराच्या वडिलांचे हात तलवारीने (Hand cut off) कापले. आरोपी अमरसिंग हा मूळचा डुंगरपूरचा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो उदयपूर येथे राहत होता.

प्राप्त माहितीनुसार, अमरसिंह याची पत्नी आणि अनुग्रह मेनारिया यांच्यामध्ये प्रेम (Love Affair) होते. यामुळे ती पतीला सोडून अनेक महिन्यांपासून अनुग्रहसोबत राहत होती. तर अनुग्रहची पत्नी त्याला सोडून वेगळी राहत होती. अनुग्रहने अमरसिंहच्या पत्नीला मुलांसह डुंगरपूर येथे नेले आणि भाड्याच्या घरात ठेवले होते. अनुग्रहचे वडील कैलास मेनारिया हे मुलाला साथ देत असल्याचा अमरसिंह याला संशय होता.

pune crime
पाकिस्तानला धडा शिकवा; पीओकेच्या कुटुंबाचे मोदींना आवाहन

यामुळे अमरसिंह हा उदयपूरच्या (udaipur) पनेरिस येथील मदारी रोडवरील अनुग्रह प्रिंटर्सच्या दुकानात तलवारी घेऊन घुसला आणि कैलास मेनारिया यांच्यावर हल्ला केला. यामध्ये कैलास यांचा हात मनगटापासून वेगळा (Hand cut off) झाला. कैलास यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. त्यांनी कैलास यांना तुटलेल्या हातासोबत रुग्णालयात पाठवले. तसेच अमरसिंह याला बेदम मारहाण केली. यानंतर लोकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल

अनुग्रहच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, तिचा पती तिच्याशिवाय दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे. अनुग्रहच्या वडिलांनीही मुलगा आपले ऐकत नसल्याचे सांगितले. दुसरीकडे अमरसिंहच्या पत्नीनेही पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com