
देशात लॉकडाऊन असताना एक प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी आतुर झाला होता. तिला भेटण्यासाठी गावात आला पण तिची भेट होण्यापूर्वीच जीवाला मुकला. ओरमांझी गावामध्ये ही घटना घडली आहे.
रांची (झारखंड): देशात लॉकडाऊन असताना एक प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी आतुर झाला होता. तिला भेटण्यासाठी गावात आला पण तिची भेट होण्यापूर्वीच जीवाला मुकला. ओरमांझी गावामध्ये ही घटना घडली आहे.
लॉकडाऊन असताना प्रियकर पोहचला तिच्या घरी अन्...
पोलिसांनी सांगितले की, एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. मनोज उरांव असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी गेल्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला. तपासादरम्यान त्याचा खून करण्यात आल्याची माहिती मिळाली.
सामूहिक बलात्कारानंतर ती रांगत-रांगत रस्त्यावर आली...
मनोजचे गावातील एका युवतीवर प्रेम होते. परंतु, दोघांच्या प्रेमाला युवतीच्या घरच्यांचा विरोध होता. एक महिन्यापूर्वी तो भेटण्यासाठी आला असताना ग्रामस्थांनी दिवसभर झाडाला बांधून ठेवले होते. परत गावात येणार नसल्याच्या बोलीवर त्याची सुटका केली होती. पण, पुन्हा तो गावात आला आणि ग्रामस्थांनी त्याला मारहाण करून खून केला. यामध्ये कोण-कोण सहभागी आहेत, याबाबत चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.