होणाऱया पत्नीची प्रेम कहाणी वाचून आले डोळ्यात पाणी...

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

दोघांचा पारंपारिक पद्धतीने विवाह ठरल्यानंतर साखरपूडाही झाला. विवाह होण्यास काही अवधी होता. दोघांमध्ये चर्चा होत होती. पण, अचानक त्याच्या फेसबुकवर तिची प्रेम कहाणी आली अन् त्याला धक्का बसला.

नवी दिल्ली: दोघांचा पारंपारिक पद्धतीने विवाह ठरल्यानंतर साखरपूडाही झाला. विवाह होण्यास काही अवधी होता. दोघांमध्ये चर्चा होत होती. पण, अचानक त्याच्या फेसबुकवर तिची प्रेम कहाणी आली अन् त्याला धक्का बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथे राहणाऱया युवतीचा काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला होता. तिच्या पहिल्या प्रियकराने प्रेमाविषयी माहिती लिहून फेसबुकवर शेअर केली व तिच्या होणाऱया पतीच्या फेसबुकवर टॅग केली. युवतीच्या होणाऱया पतीने ही प्रेमकहाणी वाचून तत्काळ विवाहास नकार दिला. यामुळे युवतीने पहिल्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास करत आहोत.

युवतीच्या होणाऱया प्रियकराने सांगितले की, 'साखपूडा झाल्यापासून खूप आनंदात होतो. दररोज तिच्याशी फोनवरून बोलत होतो. होणाऱया पत्नीला स्वप्नात पाहात होतो. पण, एक दिवस अचानक तिची प्रेम कहाणी फेसबुकवर आली. प्रेम कहाणी वाचून डोळ्यात अश्रू वाहू लागले. घरच्यांना याबाबतची माहिती देऊन विवाह तोडण्याचा निर्णय घेतला आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover shared love story on facebook due to breaked marriage