...हा तर कर्मचाऱ्यांच्या पैशावर 'दरोडा': तुलसी

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज कमी करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते के. टी. एस. तुलसी यांनी हा प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पैशावर "दरोडा' टाकून त्यांचा पैसा लुटण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे.

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज कमी करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते के. टी. एस. तुलसी यांनी हा प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पैशावर "दरोडा' टाकून त्यांचा पैसा लुटण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे.

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8.8 टक्‍क्‍यांवरून 8.65 टक्के केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर तुलसी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम हीच कर्मचाऱ्यांची बचत असते. या निधीमध्ये देशभरातील कर्मचाऱ्यांचे एकूण साधारण 6 लाख कोटी रुपये आहेत. ही रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेत आणि तेथून स्टॉक मार्केटमध्ये जाते. त्यामुळे स्टॉक मार्केट कोसळले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना परतावा कमी मिळतो. हा फार गंभीर प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कामगार संघटनाही या निर्णयाला विरोध करत आहेत. त्यामुळेच मंत्र्यांशी सुरू असलेल्या बैठकीतून कामगार संघटनांचे नेते निघून गेले.' तुलसी यांनी यावेळी सरकारने कर्मचाऱ्यांची आयुष्यभराची बचत संकटात सापडेल, असा कोणतीही कृती करू नये, असा सल्लाही दिला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनीही भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कमी करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. 'मोदी सरकारने गरीब, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात सर्जिकल स्ट्राईक केले आहे', अशी टीका सूरजेवाल यांनी केली आहे.

Web Title: Lowering interest rate on provident fund deposits dacoity: Tulsi