आनंदाची बातमी : घरगुती गॅस सिलिंडर तब्बल १६२ रुपयांनी स्वस्त

LPG cylinder price cut by over ₹162 today
LPG cylinder price cut by over ₹162 today

नवी दिल्ली : देशात लॉकडाऊनदरम्यान मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील तेल विपणन कंपनीनं विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. १४.२ किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर १६२.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर १९ किलो वजनाचा सिलिंडर २५६ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंडियन ऑईल कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये १४.२ किलोग्रॅम सिलिंडरचे दर ७४४ वरून ५८१ वर आले आहेत. कोलकातामध्ये हे दर ५८४.५०, मुंबईत ५७९ तर चैन्नईत  ५६९.५० रुपये झाले आहेत. तर १९ किलोग्रॅम गॅस सिलिंडर २५६ रुपयांनी स्वस्त झाल्याने आता त्याचे दर १२८५ रुपये ५० पैशावरून १०२९ रुपये  ५० पैसे झाला आहे. या सिलिंडरचा दर मुंबईत ९७८ रुपये, चेन्नईत ११४४ रुपये ५० पैसे झाला आहे.

एअर इंडियाचा मोठा निर्णय; या तारखेपासून सुरु करणार विमानसेवा

मे महिन्याच्या सुरुवातीला नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. आधीच लॉकडाऊनमध्ये इंधन आणि भाज्यांचे दर वाढत असताना सिलिंडर स्वस्त झाल्यानं मोठा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या आज ३८व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. लॉकडाऊनमुळे देशात बऱ्याच गोष्टी ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com